आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shweta Nanda Was Also In Town To Be With Her Father On His Birthday

अमिताभ यांच्या लेकीचे Outing, वहिनी ऐश्वर्यासोबत साजरा केला होता करवा चौथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा)
मुंबईः बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपला 72 वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी बिग बींची लाडकी लेक श्वेता नंदाने त्यांच्यासोबत वेळ घालवला. गेल्या काही दिवसांपासून श्वेता आपल्या माहेरी आहे. सोमवारी रात्री श्वेता मुंबईतील जुहू परिसरात दिसली.
यावेळी श्वेता व्हाइट टॉप आणि ब्लॅक जेगिंग्समध्ये दिसली. विशेष म्हणजे यावेळी तिच्यासोबत कुणीच नव्हते. ती एकटीच आउटिंगला निघाली होती. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी करवा चौथचा सणसुद्धा होता. श्वेताने आई जया आणि वहिनी ऐश्वर्यासोबत हा सण साजरा केला.
बिग बींच्या वाढदिवशी श्वेताचा भाऊ अभिषेक बच्चनने दोन छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली होती. या छायाचित्रात बच्चन कुटुंबातील सर्व सदस्य दिसत आहेत. श्वेताचे लग्न दिल्लीस्थित बिझनेसमन निखिल नंदासोबत झाले असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा जुहूमध्ये क्लिक झालेली श्वेताची छायाचित्रे...