आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shweta Basu Prasad Charge 1 Lakh For Prostitution

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SEX RACKET: एक लाख रुपये घ्यायची श्वेता, दलालाला मिळायचे 15 हजार रुपये कमिशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - श्वेता बसू प्रसाद)

‘मकडी’सिनेमासाठी 12 वर्षांपूर्वी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या श्वेता बसू प्रसाद या 23 वर्षीय अभिनेत्रीला वेश्या व्यवसायाच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. एका हॉटेलात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती हैदराबाद पोलिसांना मिळाली. छापा मारला तेव्हा श्वेतासह दाक्षिणात्य चित्रपटांचे सहायक दिग्दर्शक तेथे होते. दोघांनाही अटक झाली.
पोलिसांच्या चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील एक सहायक दिग्दर्शक श्वेताची डील करुन द्यायचा. वेश्या व्यवसायासाठी श्वेता एक लाख रुपये घ्यायची, त्यामधील 15 हजार रुपये दलालांना कमिशन म्हणून दिले जायचे. रविवारी हैदराबाद येथील बंजारा हिल्स परिसरातील हॉटेलमध्ये अटक झालेल्या श्वेताला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉलिवूड इंडस्ट्रीतला सहायक दिग्दर्शक बालू अभिनेत्रींच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची डिमांड करायचा, त्यापैकी 15 हजार रुपये त्याला मिळायचे. बालूच्या विरोधात ट्रॅफिकिंग अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वेताने ‘इकबाल’,‘वाह लाइफ हो तो ऐसी’, ‘डरना जरूरी है’मध्ये काम केले आहे. ‘कहानी घर घर की’ मालिकेतही ती होती. सध्या ती तेलुगू चित्रपटांत काम करते. दरम्यान, कारकीर्दीत मी अनेक चुकीचे निर्णय घेतले. पैशाची चणचण होती. त्यामुळे मी या दलदलीत फसले,’ असे श्वेताने सांगितल्याचे वृत्त इंग्रजी दैनिकात आहे. श्वेताला पुढील तीन महिने पुनर्वसन केंद्रात राहावे लागणार आहे.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, शाहिद फेम दिग्दर्शक हंसल मेहतांनी ऑफर केली श्वेताला भूमिका...