मुंबई: वेश्यव्यवसायाच्या आरोपात अटकेत असलेली अभिनेत्री श्वेता बसु प्रसादची तुरुंगातून सुटका झाली आहे. दोन महिने रेस्क्यू होममध्ये राहिल्यानंतर श्वेताने
आपले मौन सोडले आणि माध्यमांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीत श्वेताने स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले.
श्वेताने एका पत्रकाराविषयी तक्रार व्यक्त करत सांगितले, 'मी रेस्क्यू होममध्ये असेपर्यंत माझ्याविषयी अनेक वाईट बातम्या पसरवण्यात आल्या. हे मला रेस्क्यू होमच्या बाहेर आल्यानंतर कळाले. त्या पत्रकाराने माझे चुकीचे वक्तव्य सर्व माध्यमांमध्ये पसरवले. '
त्या वक्तव्यात श्वेता म्हणाली होती, 'माझी अर्थिक तंगी निर्माण झाल्याने मी वेश्याव्यवसायात पाऊल ठेवले. मला माझ्या कुटुंबीयांची मदत करायची होती. माझ्यासाठी सर्व मार्ग बंद झाले होते. काहीलोकांनी मला वेश्याव्यवसायाची कल्पना सुचवली. मला कोणताही आधार नव्हता, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे मी या व्यवसायात आले.'
परंतु श्वेताने सांगितले, 'मी अशी कोणतीच प्रतिक्रिया माध्यमांना दिली नव्हती. त्यावेळी मी तुरुंगात होते. मला माझ्या आई-वडील आणि भावाला भेटण्याचीसुध्दा परवानगी नव्हती. मग माध्यमांसोबत कशी बोलू शकते.'
श्वेता आता तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे. सध्या ती शास्त्रीय संगीतावर आधारित एका डॉक्युमेंट्रीसाठी काम करत आहे.