(श्वेता आणि अभिनव यांचे लग्नातील छायाचित्र)
मुंबईः टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा आज 34वा वाढदिवस आहे. 4 ऑक्टोबर 1980 रोजी श्वेताचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. श्वेता
आपल्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत राहिली. राजा चौधरीसोबत श्वेताचे पहिले लग्न झाले होते. मात्र राजासोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने 13 जुलै 2013 रोजी बॉयफ्रेंड अभिनव कोहलीसोबत लग्न केले.
2007 मध्ये नऊ वर्षांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणत श्वेताने राजा चौधरीसोबत घटस्फोट घेतला होता. राजा आणि श्वेताची एक मुलगी असून तिचे नाव पलक आहे. राजा दारुच्या आहारी जाऊन श्वेताला मारहाण करायचा, पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेले होते. त्यानंतर राजाच्या वागणूकीला कंटाळून तिने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
2010पासून श्वेता अभिनेता अभिनव कोहलीसोबत डेट करत होती. दोन वर्षांनंतर या दोघांनी आपले नाते जगजाहीर केले. 2013 मध्ये झलक दिखला जा या डान्सिंग रिअॅलिटी शोच्या मंचावर श्वेताने अभिनवसोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. 13 जुलै 2013 रोजी दोघे लग्नगाठीत अडकले. त्यांच्या लग्नात टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा श्वेता आणि अभिनव यांच्या लग्नाची छायाचित्रे...