आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sidharth, Alia, Ranbir, Katrina At Karan Johar’S Party

करणच्या पार्टीत एकत्र पोहोचले रणबीर-कतरिना, पाहा आणखी कोण-कोण झाले सामील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: दिग्दर्शक-निर्मात करण जोहरला पार्टी करणे आणि देणे खूपच आवडते असे जाणवते. बॉलिवूडमध्ये होणा-या पार्ट्यांमध्ये करन नेहमी दिसतोच दिसतो. सोबतच तो अनेकदा पार्टीचे अयोजन करत असतो. रविवारी (29 जून) करणने स्वत:च्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. लेटनाइटपर्यंत चाललेल्या या पार्टीमध्ये रणबीर आणि कतरिनासुध्दा दिसले.
करणच्या जवळच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे रणबीर-कतरिना या लेटनाइट पार्टीमध्ये एकत्र पोहोचले होते. दोघेही एकाच गाडीत मागील सीटवर बसलेले दिसले. रणबीर काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसला. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची हॅट घातलेली होती. दुसरीकडे, कतरिना निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसली. या दोघांसोबत पार्टीमध्ये 'स्टुडेंट ऑफ द इअर' फेमचे आलिया भट्ट आणि सिध्दार्थ मल्होत्रासुध्दा दिसले.
पार्टीमध्ये करणच्या जवळचे मित्र आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि अभिनेता अर्जुन कपूररसुध्दा दिसला. रणबीर-कतरिनाच्या नात्यात सुधार आणण्यासाठी या सेलेब्सनी अनेकदा एकत्र पार्टी केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करणच्या पार्टीमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...