आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sidharth Celebrates Success Of 'Ek Villain' With Salman And Jacqueline

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानने सिध्दार्थला दिली 'जादू की झप्पी', पाहा 'एका व्हिलन'च्या सक्सेस पार्टीचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिध्दार्थ मल्होत्रा आणि सलमान खान
मुंबई: 'एक व्हिलन'ने रुपेरी पडद्यावर धमाकेदार सुरूवात केली आहे. सिनेमाने शुक्रवारी (27 जून) 16.72 कोटी रुपयांची कमाई केली. यावर्षी ओपनिंग डेच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरल्याने सिनेमाच्या स्टारकास्टने सेलिब्रेशन सुरू केले आहे.
सिनेमाला मिळालेल्या शानदार ओपनिंगसाठी शनिवारी (28 जून) रात्री पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूडचे अनेक प्रसिध्द स्टार्स पोहोचले होते. बॉलिवूडचा 'दंबग' अर्थातच सलमान खानसुध्दा सामील झाला होता. सलमानचा आगामी 'किक' सिनेमाची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससुध्दा पार्टीत पोहोचली होती. जॅकलीन 'किक'मध्ये सलमानची नायिका म्हणून काम करत आहे. सलमानने पार्टीमध्ये सिध्दार्थला अलिंगन देऊन सिनेमाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.
या पार्टीत सलमानसह करन जोहर, रितेश देशमुख, अभिनेता शाद रंधावासुध्दा दिसला. टीव्ही क्वीन एकता कपूर, लेखक आणि अभिनेता मुश्ताक शेखसुध्दा पोहोचला होता. सिनेमाचा दिग्दर्शक मोहित सूरी पत्नी उदिता गोस्वामीसह पार्टीत सामील झाला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'एक व्हिलन'च्या ओपनिंग सक्सेस पार्टीमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...