आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sidharth Malhotra And Varun Dhawan In Shakun Batra's Next

शकुन बत्राच्या आगामी चित्रपटात वरुण-सिद्धार्थ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करण जोहरच्या बॅनरचा 2012 मध्ये प्रदर्शित झालेला 'एक मैं और एक तू' हा शकुन बत्राचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. यापूर्वी तो 'डॉन', 'रॉक ऑन' आणि 'जाने तू या जाने ना'सारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा एक भाग होता. आता दोन वर्षांनंतर त्याने आपल्या दुसर्‍या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटात दोन अभिनेत्यांचा समावेश आहे.
सुरुवातीला फरहान अख्तर आणि इम्रान खान हेच ते दोन अभिनेते असल्याचा तर्क लावण्यात आला होता. मात्र, तो चुकीचा ठरला. आता 'स्टुडेंट ऑफ द इयर' फेम वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या जोडीची या चित्रपटासाठी निवड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
शकुनच्या मते, या बाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याने सध्या तरी काहीच सांगता येणार नाही. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन्स करत आहे.