आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: सिद्धार्थची तिसरी पत्नी आहे विद्या बालन, पाहा Marriage Album

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिद्धार्थ रॉय कपूर आणि विद्या बालन यांचे लग्नाच्या दिवशीचे छायाचित्र)
मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर आज आपला 40वा वाढदिवस साजरा करत आहे. सिद्धार्थची दुसरी ओळख म्हणजे ते बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिचे पती आहेत. सहायक निर्माता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणारे सिद्धार्थ आज बॉलिवूडमधील यशस्वी निर्माते आहेत.
सिद्धार्थचा जन्म 2 ऑगस्ट 1974 रोजी झाला. त्यांचे वडील पंजाबी आहेत. तर त्यांची आई माजी मिस इंडिया आहे. याशिवया त्यांची आई बॉलिवूडची कोरिओग्राफरसुद्धा होती. सिद्धार्थ यांना दोन भाऊ असून त्यांची नावे आदित्य रॉय कपूर आणि कुणाल रॉय कपूर अशी आहेत. दोघेही बॉलिवूड अभिनेते आहेत. सिद्धार्थ डिस्ने इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. बालपणापासूनच अभ्यास हुशार असलेल्या सिद्धार्थ यांनी मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमधून कॉमर्स विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून MBAचे शिक्षण पूर्ण केले.
विद्या बालनसोबत केले लग्न...
सिद्धार्थचे लग्न बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत झाले आहे. 14 डिसेंबर 2012 रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकले. मुंबईतील वांद्रास्थित ग्रीन गिफ्ट नावाच्या बंगल्यात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नात केवळ दोघांचे नातेवाईक सहभागी झाले होते. पंजाबी आणि तामिळ पद्धतीने दोघांचे लग्न झाले. विद्या सिद्धार्थची तिसरी पत्नी आहे.
सिद्धार्थची पहिली पत्नी त्याची बालपणीची मैत्रीण होती. पहिल्या पत्नीपासून सिद्धार्थला एक मुलगासुद्धा आहे. तर दुसरी पत्नी टीव्ही निर्माती आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सिद्धार्थ आणि विद्याच्या लग्नाची निवडक छायाचित्रे...