आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'नो एंट्री\'चा सिक्वेलला अखेर मिळाला जानेवारी 2015चा मुहूर्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या तारखांच्या गोंधळामुळे मुहूर्तच न मिळणा-या ‘नो एंट्री’चा सिक्वेल 'नो एंट्री में एन्ट्री' या चित्रपटाला अखेर दिलासा मिळाला आहे. जुलैपर्यंत ‘किक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या सलमानने त्यानंतर 'नो एंट्री'च्या सिक्वेलसाठी वेळ देण्यास सहमती दिल्याने पुढील वर्षाच्या जानेवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
बोनी कपूरने 'नो एंट्री' हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर त्याचा सिक्वेल काढण्याचे जाहीर केले होते. मात्र या सिक्वेलसाठी सलमान खानच्या तारखाच मिळत नव्हत्या. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण वारंवार रद्द केले जात होते. आता मात्र जुलैनंतर सलमानने या चित्रपटासाठी 134 दिवस द्यायचे मान्य केले आहे.
सिक्वेलमध्ये सलमानबरोबर पहिल्या चित्रपटात भूमिका असलेले फरदीन खान, अनिल कपुर तर दिसणार आहेतच शिवाय त्यांच्या तिहेरी भूमिका असणार आहेत. सलमानदेखील तिहेरी भूमिकेत दिसणार आहे. अनिल कपुरला दोन जुळे भाऊ असणार आहेत. तर सलमान व फरदीनसारखे दिसणारे दोन दोन तरुण असणार आहेत.याशिवाय सेलिना जेटली, बिपाशा बासू, लारा दत्ता या अभिनेत्रींची या सिक्वेलमध्ये एंट्री ठरलेलीच आहे. मात्र या तिघींव्यतिरिक्त निर्माता आणखी सहा अभिनेत्रींना या चित्रपटात घ्यायच्या विचारात आहेत, त्यातील एका भूमिकेची ऑफर ईशा देओलला दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपटात एकंदर आठ ते दहा हिरॉइन्स आणि चार ते पाच हीरोंचा भरणा दिसणार आहे.