आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरो-हीरोईनचे किसिंग CCTV फुटेज झाले व्हायरल, अभिनेत्री म्हणाली, 'ती मी नव्हेच'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तामिळ अभिनेता सिंबू आणि कन्नड अभिनेत्री हर्षिका पूनच्चा)
मुंबईः तामिळ अभिनेता सिंबू आणि वाद यांचा संबंध जुनाच आहे. यावेळी सिंबूचे नाव कन्नड अभिनेत्री हर्षिका पूनच्चासोबतच्या किसिंग कॉन्ट्रोव्हर्सीमुळे समोर आले आहे. हे दोघे एकमेकांना किस करताना कॅमे-यात कैद झाले आहेत.
सिंबू आणि हर्षिका यांचे हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. मात्र या फुटेजमध्ये दोघांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीयेत. त्यांच्या कपड्यांवरुन हे दोघे तेच असल्याचा अंदाज बांधला जातोय. कारण हर्षिकाने ऑनलाइन पोस्ट केलेल्या छायाचित्रावरुन हा अंदाज बांधला जातोय. फुटेजमध्ये ज्या कपड्यांमध्ये हे दोघे दिसत आहेत, त्याच कपड्यांमध्ये शेजारच्या छायाचित्रात सिंबू आणि हर्षिका आहेत. दोघांचे हे छायाचित्र मलेशियातील एका हॉटेलमध्ये क्लिक झालेले आहे.
याविषयी हर्षिकाने सांगितले, की एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून तिची आणि सिंबूची भेट झाली होती. त्यादिवशी त्या दोघांनी केवळ सेल्फी क्लिक केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्या नावाचा समावेश होत असल्याचे बघून ती आश्चर्यचकित झाली आहे. फुटेजमध्ये दिसणारी ती तरुणी मी नव्हेच, असे हर्षिकाने म्हटले आहे.
या फुटेजमुळे एकीकडे हर्षिका त्रस्त झाली आहे, तर सिंबू मात्र नेहमीप्रमाणे कूल दिसतोय. सिंबूनेसुद्धा हे फुटेज फेक म्हटले आहे. सिंबू यापूर्वी एक्सगर्लफ्रेंड नयनतारासोबतची इंटीमेट छायात्रिचे लीक झाल्यामुळे चर्चेत आला होता. अलीकडेच सिंबूचे अभिनेत्री हंसिका मोटवानीसोबतसुद्धा ब्रेकअप झाले आहे.
कोण आहे हर्षिका पूनच्चा...
हर्षिका पूनच्चा कन्नड सिनेमांमधील प्रसिद्ध नाव आहे. 2008 मध्ये तिने पीयूसी या कन्नड सिनेमाद्वारे डेब्यू केले होते. त्यानंतर 'पूनम्मा' या कोंकणी भाषेच्या सिनेमात ती झळकली होती. आत्तापर्यंत 25हून अधिक सिनेमांमध्ये हर्षिकाने अभिनय केला आहे. 'क्रेजी लोका', 'जॅकी', 'थमास्सु', 'नारिया सीरे कड्डा', 'साइकिल', 'एले', 'बी3' आणि '5 इडियट्स' हे तिचे प्रमुख सिनेमे आहेत.
कोण आहे सिंबू...
सिलंबरसन थेसिंगू हा एक तामिळ अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. सिंबू 'एसटीआर' नावाने ओळखला दोता. त्याचे वडील विजय टी राजेंद्र तामिळ फिल्म इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. सिंबूने वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमाद्वारे बालकलाकाराच्या रुपात करिअरला सुरुवात केली होती. 2002 मध्ये त्याने 'काढाल अजहीवथिल्लाई' या सिनेमाद्वारे हीरोच्या रुपात प‍डद्यावर एन्ट्री घेतली. 2003 मध्ये 'धूम' या सिनेमाद्वारे त्याला बॉक्स ऑफिसवर पहिले यश मिळाले. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. 2004 मध्ये 'मनमथन' या सिनेमाद्वारे सिंबूने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. हा सिनेमा तामिळ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कन्नड अभिनेत्री हर्षिकाची निवडक छायाचित्रे...