आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयचा 'सिंग इज ब्लिंग' 2016 मध्ये होणार शिफ्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अक्षय कुमार आणि प्रभू देवा)

अक्षय कुमार आणि कृती सेनन अभिनीत 'सिंग इज ब्लिंग' चित्रपटाचे शूटिंग जानेवारीपासूनच सुरू होणार होते. मात्र, प्रभू देवा क‌थेमध्ये काही बदल करणार असल्यामुळे हे शेड्यूल पुढे ढकलण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अक्षयने प्रभू देवासोबत केलेल्या चित्रपटांपैकी 'राउडी राठोड' हा एकमेव चित्रपट हिट ठरला. या चित्रपटाने 130 कोटी रुपयांची एकूण कमाई केली होती. 'सिंग इज ब्लिंग'ची निर्माता आणि ग्रेजिंग गोट्स कंपनीमध्ये अक्षयची पार्टनर असलेली अश्विनी यार्दीदेखील 'कंटेट क्वीन' मानली जाते. त्यामुळे प्रथमच सोबत काम करत असलेल्या अक्षय, प्रभू आणि अश्विनीच्या चित्रपटाकडे इंडस्ट्री आणि प्रेक्षकांचे लक्ष आहे. मागील वर्षापासून अक्षयचे चित्रपट अपेक्षित व्यवसाय करण्यामध्ये यशस्वी होऊ शकल्याने प्रभू फार विचारपूर्वक या चित्रपटावर काम करत आहे.
'हॉलिडे...' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला खरा मात्र व्यवसायच्या बाबतीत हा चित्रपट केवळ 70 कोटी रुपये इतकीच कमाई करू शकला. शिवाय 'वन्स अपॉन टाइम इन मुंबई दोबारा', 'बॉस' आणि 'द शौकीन्स'देखील फ्लॉप ठरले. त्यामुळे अक्षयच्या आगामी वाटचालीमध्ये या चित्रपटाची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे.
'सिंग इज ब्लिंग'चा एकूण निर्मिती खर्च जवळपास 80 कोटी रुपयांच्या घरात जातो. अक्षयने करण जोहरच्या बॅनरच्या 'ब्रदर्स'ची रिलीज डेटदेखील या चित्रपटासाठी बदलली आहे. रणबीर कपूरचा 'जग्गा जासूस' ऑक्टाोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडणार अशी चिन्हे आहेत.