आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singham Returns Earned 77.25 Crore In Three Days

Box Office: 'सिंघम रिटर्न्स'ने तीन दिवसांत जमवला 77 कोटींचा गल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('सिंघम रिटर्न्स'च्या पोस्टरवर करीना कपूर आणि अजय देवगण)
मुंबई: सततच्या शूटिंगचा रोहित शेट्टीच्या 'सिंघम रिटर्न्स'ला चांगलाच फायदा होत आहे. शुक्रवारी (15 ऑगस्ट) अर्थातच रिलीजच्या दिवशी सिनेमाने 32.09 कोटींची कमाई केल्यानंतर शनिवारी (16 ऑगस्ट) 21.5 कोटींचा व्यवसाय केला आहे.
अंदाज व्यक्त केला जात आहे, की रविवारी (15 ऑगस्ट) सिनेमाने 26 कोटींचे कलेक्शन केले आहे. अशाप्रकारे या 'सिंघम रिटर्न्स'ने पहिल्या आठवड्यात 77 कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमा पंडित तरण आदर्श यांनी टि्वट करून सिनेमाला उत्कृष्ट व्यवसाय करणारा सिनेमा असे संबोधले आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस'नंतर बॉक्स ऑफिसवर रोहित शेट्टीची ही दूसरी धमाकेदार एंट्री होती.
अजय देवगण प्रॉडक्शन रोहिट शेट्टी आणि रिलायन्स एन्टरटेन्मेंटव्दारा निर्मित करण्यात आलेल्या या सिनेमाने 'चेन्नई एक्स्प्रेस', 'एक था टायगर' आणि 'किक' सिनेमांच्या पहिल्या आठवड्याच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. चार दिवसांत हा सिनेमा 100 कोटींच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या मागील दिवसांत रिलीज झालेल्या सिनेमांची आतापर्यंतची कमाई...