आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singham Returns Reaches Rs 100 Crore Mark In Just 5 Days

\'सिंघम रिटर्न्स\'ची 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री, चाहत्यांनी पोस्टरला घातल्या \'विजयी माला\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा सिंघम अर्थातच अभिनेता अजय देवगणचा गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दाखल झालेला 'सिंघम रिटर्न्स' हा सिनेमा तिकिटबारीवर चांगली कमाई करत आहे. रिलीजच्या केवळ पाच दिवसांतच हा सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
ट्रेड पंडित तरण आदर्श यांनी ट्विट केले, ''सिंघम रिटर्न्सने शुक्रवारी 32.09 कोटी, शनिवारी 21.05 कोटी, रविवारी 24.55 कोटी, सोमवारी 14.78 कोटी आणि मंगलवारी 8.21 कोटींची कमाई केली. अर्थातच या सिनेमाचा एकुण कमाईचा आकडा 100.68 कोटी रुपये एवढा आहे.''
प्रेक्षकांना हा सिनेमा एवढा पसंत पडला आहे, की सोलापूर आणि नागपूर येथील चाहत्यांनी अजय देवगणच्या पोस्टरला चक्क 'विजयी माला' घातल्या आहेत.
उल्लेखनीय म्हणजे या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला 32.09 कोटींचा व्यवसाय करुन सलमान खानच्या 'किक'ला मागे टाकले. मात्र अल्पावधीत शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याचा मान सिंघम रिटर्न्सला मिळू शकलेला नाहीये. कारण सलमानचा 'किक'सुद्धा पाच दिवसांतच शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता.
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम रिटर्न्स' हा सिनेमा 2011मध्ये रिलीज झालेल्या 'सिंघम' या सिनेमाचा सिक्वेल आहे. अजय देवगण आणि करीना कपूर या सिनेमात मेन लीडमध्ये आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'सिंघम रिटर्न्स'च्या पोस्टरला 'विजयी माला' घातलेली छायाचित्रे...