आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SLAM The Tour: 'Happy New Year' Star Cast SRK, Deepika, Boman, Farah Rock On Stage.

SLAM: शाहरुख-दीपिकाने स्टेजवर केले 'शेक योर बूटिया', पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'सलाम द टुर' (SLAM! The Tour) चे दुसरे पर्व 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 'सलाम द टुर'च्या माध्यमातून किंग खान आपल्या आगामी हॅपी न्यू इयर या सिनेमाचे प्रमोशन करत आहे. आत्तापर्यंत होस्टन, न्यू जर्सी, टोरंटो, शिकागो, व्हँक्युअर आणि सॅन जोसमध्ये 'सलाम द टुर'चे सादरीकरण झाले आहे. व्हँक्युअर आणि सॅन जोसमधील प्रमोशनल इव्हेंटची छायाचित्रे रिलीज करण्यात आली आहेत.
या प्रमोशनल छायाचित्रांमध्ये 'हॅपी न्यू इयर'ची संपूर्ण टीम मंचावर परफॉर्म करताना दिसत आहे. या इव्हेंटमध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, विवान शाह, सोनू सूद, मलायका अरोरा खान आणि दिग्दर्शिका फराह खान यांनी परफॉर्म केले. किंग खानने दीपिकासोबत शेक योर बुटियावर ताल धरला, तर फराह बोमनसह थिरकताना दिसली. 'सलाम द टुर'चा प्रवास 19 सप्टेंबरपासून होस्टन येथील टॉयटा सेंटरपासून सुरु झाला होता.
SLAM! The Tour'ची संपूर्ण टीम...
'हॅपी न्यू इयर' हा सिनेमा यावर्षी 23 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी या प्रमोशन टूरमध्ये शाहरुखसह अभिषेक बच्चन, बोमन ईरानी, सोनू सूद, दीपिका पादुकोण, विवान शाह, मलायका अरोरा खान, डायरेक्टर फराह खान, यो यो हनी सिंह, सिंगर कनिका कपूर सहभागी झाले आहेत. डान्सिंग आणि सिंगिंगच्या माध्यमातून सेलिब्रिटी रसिकांचे मनोरंजन करत आहेत.

विवान शाह 'SLAM ट्रॅक'
दीपिका पदुकोण 'आहूं आहूं' आणि 'तितली'
शाहरुख खान 'छम्मक छल्लो', 'काली काली आंखें', 'सूरज हुआ मद्धम' आणि 'मैं हूं डॉन'
अभिषेक बच्चन 'एक मैं और एक तू है'
मलायका अरोरा खान 'डेविल' आणि 'मुन्नी बदनाम हुई'
शाहरुख-दीपिका 'सतरंगी रे'
पुढील स्लाईड्समध्ये पाहा व्हँक्युअल आणि सॅन जोस येथे 'SLAM! The Tour'मध्ये परफॉर्म करतानाची सेलेब्सची खास छायाचित्रे...