आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाली एक्झिट: वृत्तनिवेदिका म्हणून करिअरला सुरुवात, वाचा प्रेरणादायी कारकिर्द!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्मिता तळवलकर यांचे संग्रहित छायाचित्र)
मराठी सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणा-या ज्येष्ठ अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निघून जाण्याने मराठी सिनेसृष्टी आणि रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.
सकाळी दहा वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात स्मिता तळवलकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. येथूनच त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. दुपारी दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दर्जेदार अदाकारी, काळजाला भिडणारा प्रभावी संवादफेक यासाठी स्मिता तळवलकर ओळखल्या जात होत्या. (ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका-निर्मात्या स्मिता तळवलकर अनंतात विलिन)
फिलॉसॉफी आणि सायकॉलॉजीमध्ये बी.ए आणि मास कम्युनिकेशन, जर्नलिझमची पदवी प्राप्त करणा-या स्मिता तळवलकर यांनी1972 मध्ये दुरदर्नवर वृत्तनिवेदिका म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. 1983 मध्ये त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर 1986 मध्ये 'गडबड घोटाळा' आणि 'तू सौभाग्यवती हो' या सिनेमांतून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. 1889 मध्ये वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. 'अस्मिता चित्र' नावाची निर्मिती संस्था स्थापन केली.

'अस्मिता चित्र' बॅनरखाली त्यांनी आजवर 25 मालिका आणि 6 सिनेमांची निर्मिती केली. तर स्वतः 40 मराठी आणि 3 हिंदी मालिकांमध्ये अभिनयसुद्धा केला. गेली 40 वर्षे मालिका, नाटक, सिनेमा या माध्यमात काम करणा-या स्मिता यांनी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे प्रमुख कार्यवाहपद भूषविले होते. (मराठी सिनेसृष्टीतील स्मित हास्य हरपले...)
स्मिता तळवलकर यांना मिळालेल्या पुरस्कारांसह त्यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...