आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pix: ही अभिनेत्री पदार्पणातच झळकली सलमान खानसोबत, मात्र आज आहे बी टाऊनमधून गायब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता सलमान खानसोबत स्नेहा उल्लाल)

बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उल्लाल आज आपला 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. 18 डिसेंबर 1987 रोजी हैदराबाद येथे स्नेहाचा जन्म झाला. बॉलिवूडसोबतच निवडक टॉलिवूड सिनेमांमध्ये स्नेहा झळकली आहे. स्नेहाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'लकी नो टाइम फॉर लव्ह' या सिनेमाद्वारे केली होती. पदार्पणातच तिला सुपरस्टार सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. या सिनेमानंतर स्नेहाची तुलना माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनसोबत होऊ लागली. याचे कारण म्हणजे स्नेहा ब-याच अंशी ऐश्वर्यासारखी दिसते.
स्नेहाने 'आर्यन' या आणखी एका हिंदी सिनेमातसुद्धा काम केले आहे. मात्र ऐश्वर्यासोबत होणा-या सततच्या तुलनेमुळे स्नेहाला बी टाऊनमध्ये फार काळ बस्तान बसवता आले नाही. पदार्पणातच सलमान खानसोबत काम करण्याचा फायदा तिच्या बॉलिवूड करिअरला होऊ शकला नाही. येथे पदरी अपयश येत असल्याचे पाहून तिने आपला मोर्चा टॉलिवूडकडे वळवला. येथे तिने निवडक तेलगू सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. तेलगूसोबतच बंगाली सिनेमातही स्नेहा झळकली आहे.
आज स्नेहाच्या वाढदिवसाचे औचित्या साधत आम्ही तुम्हाला तिची ग्लॅमरस छायाचित्रे दाखवत आहोत.