आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soha Ali Khan And Kunal Khemu New Flat In Mumbai

लग्नानंतर या फ्लॅटमध्ये राहणार आहेत सोहा आणि कुणाल, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लवकरच कुणाल खेमू आणिसोहा अली पती-पत्नी होणार आहेत. दोघे 25 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. divyamarathi.com तुम्हाला सोहा आणि कुणाल खेमू यांच्या घराची एक्सक्लूसिव्ह छायाचित्रे दाखवणार आहे, या घरात दोघे लग्नानंतर राहणार आहेत.
मुंबईच्या खार परिसरात सोहा आणि कुणालचे नवीन घर असेल. खार स्थित मेहर आपार्टमेंटमध्ये सोहा आणि कुणालने फ्लॅट घेतला आहे. या फ्लॅटमध्ये दोघे लग्न करणार आहेत. सोहा आपल्या कुटुंबीयांना आणि काही परिचित लोकांना येथे एक छोटीशी पार्टी देणार आहे, असे सोहाच्या संबंधीत एकाने सांगितले. असेही सांगितले जाते, की या पार्टीत क्रिकेट क्षेत्रातील आणि बॉलिवूडमंडळी उपस्थित राहणार आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, सोहा आणि कुणार यांनी 2012मध्ये 11 कोटींमध्ये मेहर अपार्टमेंटच्या 9व्या फ्लोअरवर फ्लॅट खरेदी केला होता. मुंबईच्या खार परिसरात बॉलिवूडचे अनेक स्टार्स राहतात. हे ठिकाण वांद्राजवळ आहे. खारमध्ये आमिर खान, रणवीर सिंह, प्रिती झिंटा, बिपाशा बसु, करण जोहर आणि महेश भट्टसह अनेक सेलेब्स राहतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोहा आणि कुणालच्या नवीन फ्लॅटचे काही PHOTOS...
सर्व फोटो- अजित रेडेकर...