आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soha Ali Khan Tied The Knot With Her Kunal Khemu

नवाबांची सोहा बनली कुणाल खेमूची अर्धांगिनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडची अभिनेत्री आणि सैफ अली खानची लहान बहिण सोहा अली खान आज (रविवारी) लग्न बंधनात अडकली आहे. अगदी साध्या पद्धतीने सोहाचे लग्न खार येथील मेहर अपार्टमेंट येथे पार पडले. सोहाने तिचा बॉयफ्रेंड कुणाल खेमू याच्याशी लग्न केले आहे.

दरम्यान, आज पार पडलेल्या या लग्न सोहळ्यासाठी सोहा आणि कुणालच्या परिवारातील सदस्यांशिवाय काही जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. यावेळी सोहाची आई शर्मिला टागोर, भाऊ सैफ अली खान आणि वहिनी करीना कपूर खान उपस्थित होते. करिना यावेळी खुप आनंदी असल्याचे दिसून आले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सोहा आणि कुणाल यांच्या लग्नाचे काही निवडक फोटो...