(बहीण अर्पिता आणि पत्नी सीमा खानसोबत सोहेल खान)
मुंबईः सोहेल खान बॉलिवूड अभिनेता
सलमान खानचा धाकटा भाऊ आहे. सोहेलचा जन्म 20 डिसेंबर 1970 रोजी झाला. दोन्ही भाऊ सलमान आणि अरबाज खानच्या पावलावर पाऊल ठेवत सोहेलनेसुद्धा बी टाऊनला
आपली कर्मभूमी बनवली आहे. काही निवडक सिनेमांमध्ये अभिनय केल्यानंतर आता सोहेल दिग्दर्शक म्हणून नावारुपास आला आहे.
अभिनयात सोहेलला त्याला थोरला भाऊ
सलमान खानप्रमाणे यश मिळू शकले नाही. अरबाज खानप्रमाणे सोहेलसुद्धा सिनेमांमध्ये छोटेखानी भूमिकेत फिट बसते. आत्तापर्यंत त्याने एकही सोलो हिट सिनेमा दिलेला नाही. 'आर्यन' आणि 'कृष्णा कॉटेज' या सिनेमांमध्ये सोहेल लीड अॅक्टर म्हणून झळकला, मात्र हे दोन्ही सिनेमे
बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकले नाहीत.
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कॅमे-यामागे राहून सोहेल फिल्म मेकिंगचे बारकावे शिकला. संजय कपूर,
सलमान खान आणि शिल्पा शेट्टी स्टारर 'औजार' या सिनेमाद्वारे सोहेले स्वतःला पहिल्यांदा दिग्दर्शकाच्या रुपात स्थापित केले. त्याला दिग्दर्शक म्हणून खरी ओळख मिळवून दिली ती 'प्यार किया तो डरना क्या' या सिनेमाने.
अभिनय कारकिर्दः
सोहेलने 2002 मध्ये 'मैनें दिल तुझको दिया' या सिनेमाद्वारे आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. या सिनेमात त्याच्यासोबत समीरा रेड्डी मेन लीडमध्ये झळकली होती. या सिनेमाने छोट्या शहरांत ठिकठाक व्यवसाय केला. महानगरांमध्ये हा सिनेमा नाकारला गेला. त्यानंतर सोहेलने 'डरना मना है', 'लकीर', 'मैने प्यार क्यूं किया', 'फाइट क्लब', 'सलाम-ए-इश्क', 'हीरोज' आणि 'हॅलो' या मल्टीस्टारर सिनेमांमध्ये अभिनय केला. या सिनेमातील त्याच्या भूमिकांचे कौतुकसुद्धा झाले.
फिल्मी अंदाजात झाले लग्न...
सोहेल खानचे लग्न सीमा सचदेवसोबत झाले आहे. या दाम्पत्याला दोन मुले असून निर्वाण आणि योहान ही त्यांची नावे आहेत. रंजक गोष्ट म्हणजे, सोहेलने सीमासोबत 'प्यार किया तो डरना क्या' या सिनेमाच्या रिलीजच्या दिवशीच पळून जाऊन लग्न थाटले होते. या दोघांच्या लग्नाला सीमाच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे सोहेलने सीमासोबत पळून जाऊन आर्य समाज मंदिरात फिल्मी स्टाइलने लग्न केले होते. नंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला समंती दिली. सोहेलची पत्नी प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.
बाइक आणि स्पोर्ट्सची आवड...
सोहेल खानला वेगवेगळ्या बाइक्सची आवड आहे. तो नेहमी बाइक राइड करताना दिसतो. याशिवाय खेळातही त्याला विशेष रुची आहे. चॅरीटी मॅचदरम्यान सोहेल खान नेहमी मैदानावर दिसत असतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोहेल खानची निवडक छायाचित्रे...