आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Soha Kunal, Riteish Genelia: B town Couples Spend Quality Time At Saif Ali Khan’s Plush Bungalow

सैफिनाच्या घरी स्टार्सची मांदियाळी, रितेश-जेनेलियासह पोहोचले अनेक स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः रितेश देशमुख, जेनेलिया, सोहा-शर्मिला टागोर-कुणाल खेमु मित्रांसोबत, कुणाल खेमू)

अलीकडेच विवाहबद्ध झालेले सेलिब्रिटी कपल म्हणजे कुणाल खेमू आणि सोहा अली खान सध्या मीडियापासून दूर राहात आहेत. मात्र अलीकडेच हे दोघे सैफ-करीनाच्या घरी कुटुंबीय आणि मित्रांसोबत क्वॉलिटी वेळ घालवताना दिसले.
सैफ-करीनाच्या वांद्रास्थित घराबाहेर पडताना हे दोघे कॅमे-यात क्लिक झाले. या दोघांव्यतिरिक्त सोहाची आई शर्मिला टागोर, अभिनेता रितेश देशमुख, त्याची पत्नी जेनेलिया, सबा अली खान, साजिद खानसुद्धा या छोटेखानी पार्टीत सहभागी झाले होते.
मिसेस खेमू अर्थातच सोहा यावेळी कॅज्युअल रुपात दिसली. तिने हलका मेकअप केला होता. यावेळी कुणाल फोनवर बिझी दिसला. शिवाय तो थोडा दमलेलासुद्धा वाटला. मात्र तरीदेखील त्याने आपल्या पत्नीसोबत फोटोग्राफर्सना पोज दिल्या. यावेळी सैफ आणि करीना मात्र कॅमे-यात क्लिक झाले नाहीत.
पुढे पाहा, सैफिनाच्या घरी पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...