आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'Day:\'सिंघम\'ची गर्जना नाही आली कामी, तेलगु चित्रपटांपर्यंतच मर्यादित राहिले नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सिंघम'फेम काजल अग्रवाल हिला बॉलिवूड सिनेमांपेक्षा दक्षिण भारतीय सिनेमांत जास्त यश मिळाले आहे. काजल दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. विशेषतः तेलगु सिनेप्रेमींसाठी काजल हे मोठं नाव आहे. आज काजल अग्रवालचा वाढदिवस आहे. 19 जून 1985ला जन्मलेल्या काजलने पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे.
काजलने एका मुलाखातीत सांगितले होते, की लहानपणापासून तिला टीव्ही जर्नलिस्ट व्हायचे होते, परंतू काळाने तिला अभिनेत्री बनवले. सिनेमात येण्याआधी काजल एमबीएला अ‍ॅडमिशन घेण्याचा विचार करत होती. एक दिवस तिला 'क्यों हो गया ना' या सिनेमाच्या ऑ़डीशनबद्दल मित्रांकडून समजले आणि नशीब आजमावण्यासाठी ती ऑडीशन द्यायला गेली. काजलची सिनेमासाठी निवड झाली तरी तिचा खरा प्रवास नंतर चालू झाला. आजपर्यंत बॉलिवूडमधल्या टॉप अभिनेत्रींमध्ये तिचं नाव येऊ शकलं नाही.

2004मध्ये 'क्यों हो गया ना'मधुन केले बॉलिवूडमध्ये पदार्पण
काजलने 2004 मध्ये आलेल्या 'क्यों हो गया ना' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमधल्या प्रवासाला सुरूवात केली. या सिनेमात तिने ऐश्वर्या राय बच्चनच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या सिनेमाचा काजलला जास्त फायदा झाला नाही आणि तिने तेलगु सिनेमाकडे कुच केली. 2007 मध्ये आलेल्या 'लक्ष्मी कल्याणम' या तेलगु सिनेमाद्वारे तिने दक्षिणेत पाऊल ठेवलं. या सिनेमात तिच्या अपोझिट साउथचा अभिनेता नंदामुरी कल्याण राम होता. परंतू याचासुद्धा तिला खास फायदा झाला नाही.
काजलला पहिलं व्यावसायिक यश 'चंदामामा'मुळे मिळालं आणि 2009 मध्ये आलेला सिनेमा 'मगाधीरा'ने तिला तेलगु इंडस्ट्रीत प्रस्थापित केले. या सिनेमाच्या यशानंतर तिच्या अभिनयाची गाडी चालू झाली. 'मगाधीरा'त तिच्या अपोझिट तेलगु सिनेमांचा स्टार चिरंजीवीचा मुलगा रामचरण तेजा होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्तचा व्यवसाय केला. या सिनेमासाठी काजलला बेस्ट तेलगु अ‍ॅक्ट्रेसच्या फिल्मफेअर अवॉर्डचे नामांकन मिळालं होतं.

'सिंघम'मुळे बॉलिवूडमध्ये मिळाली ओळख
2011 मध्ये रोहित शेट्टीचा सिनेमा 'सिंघम'मुळे तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. या सिनेमात तिच्या अपोझिट अजय देवगण होता. 'सिंघम' 2011 मधला एक ब्लॉकबस्टर सिनेमा होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 140 कोटींची कमाई केली होते. या सिनेमानंतर काजल 2013मध्ये आलेल्या अक्षय कुमारच्या 'स्पेशल 26' या सिनेमात दिसली होती. हा सिनेमाचे समीक्षकांकडून बरेच कौतुक झाले, परंतू हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर याची जादू चालू शकली नाही.
'थुपक्की'साठी मिळाला आहे बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड
2013 मध्ये 'थुपक्की' आणि 2010 मध्ये 'वृंदावनम' या सिनेमासाठी काजलला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा सिनेमा अवॉर्ड मिळालेला आहे. याशिवाय 'मगाधीरा', 'डार्लिंग', 'मि. परफेक्ट' या सिनेमांसाठी तिला सर्वोत्क़ृष्ट अभिनेत्रीचे साउथच्या फिल्मफेअर अवॉर्डचं नामांकन मिळालं होतं.
पुढच्या स्लाइडसवर पाहा काजलचे निवडक 12 फोटोज्