आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonakshi Hosts Special Screening Of Rio2 For Kids

PICS : 'रियो 2'च्या स्क्रिनिंगमध्ये सोनाक्षीची मुलांसह धमाल-मस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या 'रियो 2' या हॉलिवूड एनिमेशन सिनेमाशी निगडीत इवेंट्समध्ये बिझी आहे. अलीकडेच मुंबईतील पीव्हीआरमध्ये 'रियो 2'चे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. हे स्क्रिनिंग विशेषतः लहान मुलांसाठी ठेवण्यात आले होते.
यावेळी सोनाक्षी मुलांसह धमाल करताना दिसली. तिने मुलांसह केकसुद्धा कापला. या केकवर रियोचे छायाचित्र होते.
'रियो 2'च्या पोस्टरवर सोनाक्षी आणि इमरान खान दिसत आहेत. 2 एप्रिल रोजी या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. ट्रेलर लाँचिंग इवेंटमध्ये सोनाक्षीसह इमरान खानसुद्धा सहभागी झाला होता. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये इमरानने ब्लू आणि सोनाक्षीने मकाव्स या पात्रांसाठी आपला आवाज दिला आहे. हा सिनेमा येत्या 11 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
पु़ढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'रियो 2'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सोनाक्षीची खास छायाचित्रे...