(सोनाक्षीचे लाड करताना शत्रुघ्न, सिन्हा आणि अग्रवाल कुटुंब)
मुंबईः शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा आणि सोनाक्षी सिन्हा हिचा थोरला भाऊ कुश सिन्हाचे लग्नाचे रिसेप्शन सोमवारी रात्री मुंबईत पार पडले. सहारा स्टार हॉटेलमध्ये ही रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. कुशचे लग्न लंडनची रहिवासी असलेल्या तरुणा अग्रवालसोबत झाले.
कुशच्या रिसेप्शनमध्ये अग्रवाल आणि सिन्हा कुटुंब खूप आनंदी दिसले. या दोन्ही कुटुंबीयांनी एकत्र भरपूर फोटो काढून घेतले. फॅमिली फोटोमध्ये कुश आणि तरुणा मध्यभागी तर सिन्हा कुटुंब डावीकडे आणि अग्रवाल कुटुंबीय उजवीकडे उभे दिसले.
सोनाक्षीचे आईवडिलांसोबत फोटो
भावाच्या लग्नाचा आनंद सोनाक्षीच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होते. तिने वडील शत्रुघ्न आणि आई पूनमसोबत भरपूर फोटो काढून घेतले. यावेळी शत्रुघ्न सिन्हा
आपल्या लेकीचा लाड करताना दिसले. या कार्यक्रमात सोनाक्षीने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रिसेप्शनमध्ये क्लिक झालेली सिन्हा आणि अग्रवाल कुटुंबीयांची खास छायाचित्रे...