(संजय कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि गायक इम्रान खान)
मुंबई- अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा अभिनीत 'तेवर'चे नवीन गाणे 'लेट्स सेलिब्रेट' रिलीज झाले आहे. या गाण्याला सिनेमाची मुख्य अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि संजय कपूरने रिलीज केले आहे. यावेळी सिनेमाचा मुख्य नायक अर्जुन कपूर उपस्थित नव्हता.
'लेट्स सेलिब्रेट'मध्ये गायक इम्रान खानसुध्दा दिसला. 'लेट्स सेलिब्रेट' एक फास्ट डान्स नंबर आहे. सोनाक्षी आणि अर्जुन दोघे गाण्यात इम्प्रेसिव्ह दिसत आहेत. 'तेवर'च्या निर्मात्यांनी या वर्षीचे पार्टी अँथम बनवण्यात कोणतीच कसर सोडलेली नाही. गाण्याला लार्जर दॅन लाइफ सेट आणि हजार फ्लॅशलाइट्ससह शूट करण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटची छायाचित्रे...