मुंबई: गौरी खानने बुधवारी (8 ऑक्टोबर) 44वा वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थडे निमित्त पती
शाहरुख खानने शानदार पार्टीचे आयोजन केले होते. या बर्थडे पार्टीत बॉलिवूडमधून अनेक सेलेब्सनी हजेरी लावली. ही पार्टी संजय कपूरच्या घरी ठेवली होती.
पार्टीत शाहरुखच्या 'हॅपी न्यू इअर' आगामी सिनेमाची दिग्दर्शिका फराह खानसुध्दा पोहोचली होती. सोबतच, पार्टीत चंकी पांडे, सोनाक्षी सिन्हा, अर्जुन कपूर, करिश्मा कपूर, संजय कपूर, मोहित मारवाह, डिझाइनर नंदिता मेहतानी, अरमान जैनची आई रीमा जैनसुध्दा पोहोचल्या होत्या. अभिनेत्री
अमृता अरोरा पती शकील लडकसोबत पार्टीत सामील झाली होती.
शाहरुख सध्या 'हॅपी न्यू इअर'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. परंतु गौरीच्या त्याने वाढदिवसासाठी पूर्ण वेळ काढला होता. 'हॅपी न्यू इअर' येत्या 24 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. त्यामध्ये दीपिका पदुकोण,
अभिषेक बच्चन, बोमण ईराणी, सोनू सुदसुध्दा मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा संजय कपूरच्या घरी झालेल्या गौरीच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...