आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाक्षीचा अजब फंडा, म्हणे 'टेन्शनमध्ये करते चांगले काम' !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'दबंग' चित्रपटातून पदार्पण करणार्‍या सोनाक्षी सिन्हाला दबावाखाली चांगले काम करणे जमते असे आम्ही नव्हे, तर ती म्हणाली आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली की, मी दबावाखाली चांगले काम करते. मला लहानपणापासून याची सवय आहे. लहानपणी मी परीक्षाचा ताण घ्यायचे आणि मन लावून अभ्यास करायचे आणि वर्षअखेरीस त्यांचा परिणाम चांगला यायचा.
सोनाक्षीने फॅशन डिझायइनिंगमध्ये कोर्स केला आहे. तिला याच क्षेत्रात करिअर करायचे होते. चित्रपटात येण्याचा तिने कधी विचारही केला नव्हता, पण आज ती टॉपच्या अभिनेत्रीमध्ये सामील झाली आहे. 'दबंग' चित्रपटाची ऑफरदेखील तिने भीतभीत स्वीकारला होता, पण याच चित्रपटातल्या तिच्या अभिनयामुळे तिला खूप प्रशंसा मिळाली आणि या चित्रपटामुळे तिला अनेक चित्रपटाचे प्रस्ताव मिळाले. या चित्रपटामुळे एकीकडे तिची प्रशंसा झाली तर दुसरीकडे तिच्यावर टीकासुद्धा झाली. सलमानमुळेच चित्रपट चालला, हीरोइन कोणतीही असती तर चालली असती, असे बोलण्यात आले यावर ती म्हणाली की, मी अशा गोष्टीमुळे प्रभावित होत नाही आणि त्यावर लक्षच देत नाही. सलमानसोबत मी पदार्पण केले याचाच मला आनंद होतो आहे.
सोनाक्षीचा आगामी चित्रपट 'जोकर' आहे. यात तिचा हीरो अक्षय कुमार आहे. ती म्हणते हा चित्रपट कर्मशियल चित्रपटापेक्षा थोडा वेगळा आहे. यात अँलियन्सदेखील आहेत. मला असे चित्रपट आणि पुस्तके वाचायला आवडतात. 'दबंग'नंतर मी हा चित्रपट साइन केला होता पण 'राउडी' आधीच बनला.
सध्या सोनाक्षीने चित्रीकरणातून काही दिवसासाठी सुटी घेतली आहे. कारण तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे तिने आपल्या सर्व कामाला बाजूला ठेवले आहे. सोनाक्षी आपल्या वडिलांची लाडकी लेक आहे आणि ती वडिलांवर तितकेच प्रेम करते.
PHOTOS : 'राऊडी राठौर'च्या सक्सेस पार्टीत पोहोचले अक्की-सोनाक्षी
सोनाक्षी सिन्हा- मर्यादा आणि मादकता
कोणाचीही नक्कल करत नाही : सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा भविष्यात करणार आयटम साँग