आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: भावाच्या लग्नात सोनाक्षीने हातावर काढून घेतली मेंदी, असा व्यक्त केला आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भावाच्या लग्नात हातावर मेंदी काढून घेताना सोनाक्षी सिन्हा)
मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा थोरला भाऊ कुश सिन्हाचे रविवारी थाटात लग्न झाले. आपल्या भावाच्या लग्नात सोनाक्षी खूप आनंदी दिसली. तिने आपल्या दोन्ही हातांवर खास मेंदी काढून घेतली. नटून-थटून तिने भावाचे लग्न एन्जॉय केले.
सोनाक्षीने लग्नात सहभागी झालेल्या कुटुंबीय आणि पाहुण्यांसोबत खास फोटोसुद्धा काढून घेतले. लग्नात सोनाक्षीने पांढ-या रंगाची लहेंगाचोली परिधान केली होती.
31 वर्षीय कुशचे लग्न लंडनची रहिवाशी असलेल्या तरुणा अग्रवालसोबत झाले आहे. या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. याशिवाय डिझायनर मनीष मल्होत्रा, गायक मिकासिंग, दिग्दर्शक अमित शर्मा यांच्यासह फिल्म इंडस्ट्रीतील सोनाक्षीचे अनेक फ्रेंड्स या लग्नात सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा सोनाक्षीने आपल्या भावाच्या लग्नात कसे एन्जॉय केले...