आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Action Jackson: Sonakshi Sinha's Exclusive Look In The Film

'अॅक्शन जॅक्सन'मध्ये असा असेल सोनाक्षीचा LOOK, सिनेमासाठी कमी केले वजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनाक्षी सिन्हा)
मुंबईः अजय देवगण सध्या आपल्या आगामी 'अॅक्शन जॅक्सन' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात अजयसोबत सोनाक्षी सिन्हा, यामी गौतम, सोनू सूद, कुणाल रॉय आणि मनस्वी ममगई महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमातील सोनाक्षीचा फस्ट लूक समोर आला आहे.
सोनाक्षीचा हा लूक ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. ब्लॅक कलरच्या स्लीव्हलेस टॉप आणि ब्लॅक शॉर्ट्समध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. सोनाक्षीचे हे छायाचित्र ऑस्ट्रेलियातील शूटिंगवेळेचे आहे. विशेष म्हणजे या सिनेमासाठी सोनाक्षीने बरेच वजन कमी केले आहे. या छायाचित्रात ती पूर्वीपेक्षा स्लीम दिसत आहे.
'अॅक्शन जॅक्सन' हा सिनेमा प्रभूदेवा दिग्दर्शित करत आहेत. सोनाक्षी यापूर्वी प्रभूदेवाच्या 'आर... राजकुमार' या सिनेमात झळकली होती. यामध्ये ती सलवार सूटमध्येच दिसली होती.
'अॅक्शन जॅक्सन'मधील अजयचा लूक कसा असेल, याचेही छायाचित्र समोर आले आहे.
अलीकडेच एका आयटम शूटवेळी अजय आणि ममगईचा लूक बघायला मिळाला होता.
पुढे पाहा, सोनाक्षी आणि अजयची छायाचित्रे...