आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाक्षी सिन्हाच्या नव्या सिनेमा प्रस्तावाच्या चर्चेला पूर्णविराम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडमध्ये अभिनयाला सुरुवात केल्यापासून सोनाक्षी तीन किंवा त्यापेक्षा जास्त सिनमांचे शुटिंग एकाच वेळी करत आली आहे. वर्षाच्या प्रत्येक तिमाहीत तिचा एक सिनेमा प्रदर्शित होत राहिला. मात्र, या वेळी पहिल्यांदाच तिच्याकडे एकही नवीन सिनेमा नाही. अर्जुन कपूरसोबतच्या ‘तेवर’चे शुटिंग जवळपास पूर्ण झाली आहे. याशिवाय अजय देवगणसोबतच्या ‘अॅक्शन जॅक्सन’ची केवळ 20 दिवसांचे शुटिंग बाकी आहे. अजय हे शुटिंग ‘सिंघम रिटर्न्‍स’चे शुटिंग पूर्ण झाल्यानंतर करणार आहे. या दोन सिनेमांशिवाय सध्या सोनाक्षीकडे कोणताही नवा सिनेमा नाही. तसेच तसा एखाद्या सिनेमाचा प्रस्तावदेखील आलेला नाही.
सोनाक्षी जरी रजनीकांतसोबत ‘लिंगा’मधून दक्षिणेत पदार्पण करत असली तरी हिंदी क्षेत्रात या सिनेमाचा खास प्रभाव राहणार नसल्याचे म्हटले जात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सोनाक्षीची या सिनेमात उल्लेखनीय भूमिका नाही. त्यामुळे नेहमीच सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यग्र असलेल्या सोनाक्षीकडे सध्या एकही सिनेमा नाही. बॉलीवूड वर्तुळात अशी चर्चा आहे की, एक तर तिच्या अभिनयाची जादू कमी होत चालली किंवा भारतीय मुलीच्या पारंपरिक प्रतिमेत ती दिसत असल्याने तिच्यापुढचे पर्याय कमी झाले असावेत.