आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sonakshi Sinha's Shotgun Production, Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शॉटगन प्रोडक्शनचा सिनेमा रखडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनाक्षी सिन्हाच्या करिअरमध्ये ‘अच्छे दिन’ आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शॉटगन प्रॉडक्शन्स पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला..
सोनाक्षीच्या लव आणि कुश सिन्हा या दोन भावांनी निर्मिती कंपनीची जबाबदारी सांभाळली. ‘ओह माय गॉड’ फेम दिग्दर्शक उमेश शुक्लाला एक सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी साइन करण्यात आले. सुरुवातीला मे-जूनमध्ये शॉटगन प्रॉडक्शन्सच्या सिनेमाचे शुटिंग सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा सिनेमा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे.
उमेश सध्या अभिषेक बच्चन आणि असिनसोबत ‘ऑल इज वेल’ची शूटिंग करत आहे. त्यानंतर अमिताभ बच्चनसोबत ‘102 नॉट आऊट’चे शुटिंग सुरू करण्याचे शेड्यूल आखण्यात आले आहे. त्यामुळे 2015 पर्यंत उमेश व्यग्र राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीने सिनेमाचे काम चालू असल्याचे सांगितले होते. मात्र सूत्रांनुसार, सिनेमाची कथादेखील अजून पूर्ण झाली नाही. एकूणच सोनाक्षीच्या भावाच्या कंपनीचे काम सध्या डबघाईला असल्याचे चित्र आहे.