आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'क्लासमेट\'मध्ये झळकणार मराठी इंडस्ट्रीतील या ग्लॅमरस अभिनेत्री, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील दोन ग्लॅमरस अभिनेत्री अर्थातच सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णी मोठ्या पडद्यावर लवकरच एकत्र झळकणार आहेत. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या आगामी 'क्लासमेट' या मराठी सिनेमासाठी सई आणि सोनालीला साइन करण्यात आले आहे. 2006मध्ये रिलीज झालेल्या 'क्लासमेट' या मल्याळम सिनेमाचा हा मराठी रिमेक असणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'क्लासमेट'मध्ये या दोघीही महाविद्यालयीन तरुणींची भूमिका साकारणार आहेत. सई आणि सोनालीसह या सिनेमात सचित पाटील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
पडद्यावर या दोन्ही ग्लॅमरस अभिनेत्रींना एकत्र बघणे हे त्यांच्या चाहत्यांसाठी एक ट्रीट ठरणार आहे. तसे पाहता 'ग्रॅण्ड मस्ती' या सिनेमात सोनाली आणि 'नो एन्ट्री पुढे धोका आहे' या सिनेमात सईचा हॉट अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. आता 'क्लासमेट'मध्ये या दोघींपैकी कोण जास्त हॉट दिसणार हे पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णीचा हॉट अंदाज...