आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनाली कुलकर्णी पॉप सिंगरच्या भूमिकेत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सध्याच्या काळात मराठी चित्रपटांमध्ये नायिका विविध प्रयोगशील भूमिका करण्यावर भर देत आहेत. यातीलच एक प्रयोग म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘फिफ्टी फिफ्टी’ या चित्रपटात पॉप गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन मनमोहन देसाई यांचा मुलगा केतन देसाई करत आहे. सोनालीबरोबर अभिनेता सुबोध भावे आणि अशोक सराफ यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात सोनाली अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. आजवर वयात मोठे अंतर असलेल्या जोडीमध्ये ही दुर्मिळ जोडी तर ठरणार आहेच, शिवाय या चित्रपटात एक वेगळ्या प्रकारचा प्रेमत्रिकोण दाखवला जाणार आहे. पॉप गायनात संघर्ष करत असताना सोनालीची भेट सुबोधशी होते व त्यातून तिच्या करिअरला यशस्वी वळण मिळते. मात्र, आयुष्यात एक प्रेमत्रिकोण निर्माण होतो अशी चित्रपटाची कथा आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नाही. मात्र, पॉप गायनावर आधारित हा मराठीमध्ये पहिलाच चित्रपट असणार आहे.
एक तारा’ नंतरचा नवा प्रयोग !
‘रॉकस्टार’ या इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटाची नक्कल करून अवधूत गुप्ते यांनी ‘एक तारा’ हा मराठी चित्रपट पडद्यावर आणला होता. त्यात संतोष जुवेकरने मुख्य भूमिका साकारली होती. सतरंगी रे, एक तारा यासारख्या चित्रपटांमधून मराठीमध्ये रॉक आणण्याचा प्रयत्न केला गेला. आता पुन्हा एकदा ‘फिफ्टी फिफ्टी’च्या निमित्ताने मराठीत पॉप संगीताची झलक बघायला मिळणार आहे.