आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'झपाटलेला 2'मध्ये सोनालीच्या लावणीचा ठसका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनाली कुलकर्णीची ही झलक आहे आगामी 'झपाटलेला 2' या सिनेमातील. 'नटरंग'नंतर पुन्हा एकदा सिनेरसिकांना सोनालीच्या ठसकेबाज लावणीची ट्रीट या सिनेमातून मिळणार आहे.

वीस वर्षांपूर्वी महेश कोठारे यांच्या कल्पक दिग्दर्शनातून साकारलेला 'झपाटलेला'चा सिक्वेल असलेल्या या सिनेमात सोनाली प्रमुख भूमिकेत आहे. आदिनाथ कोठारेबरोबर ती या सिनेमात झळकणार आहे. आदिनाथ आणि सोनालीबरोबरच सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे ही स्टारकास्ट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

या सिनेमात आदिनाथने लक्ष्मिकांत बोलकेच्या मुलाची भूमिका साकारली आहे. तर सोनाली कुलकर्णीचा लावणीचा तंबू सिनेमात बघायला मिळणार आहे. अर्थातच या सिनेमात सोनालीच्या डान्सचा तडका पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

या सिनेमाची पूर्ण कथा जत्रेमध्येच घडते त्यामुळे जत्रेचा एक मोठा सेट यासाठी तयार करण्यात आला. ज्यामध्ये विविध खेळांचे तंबू, टुरिंग टॉकीज, लावणीचा फड, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, खाऊ गल्ली ते जायंट व्हिल अशा सर्वच गोष्टींचा समावेश होता. याच जत्रेत मकरंद (मकरंद अनासपुरे)चा बोलक्या बाहुल्यांचा आणि सोनालीचा (सोनाली कुलकर्णी) लावणीचा तंबू आहे. माघी गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने भरलेली ही जत्रा कव्हर करण्यासाठी एका वृत्तवाहिनीची पत्रकार असेलली गौरी वाघ (सई ताम्हणकर) तिथे पोहोचते. इंजिनिअरिंग केलेला आणि बोलक्या बाहुल्यांच्या खेळाची आवड असेलला आदित्य बोलके (आदिनाथ कोठारे) त्याच गावाचा रहिवाशी आहे. त्यामुळे तोसुद्धा या जत्रेत सहभागी होतो आणि या सर्वांच्या आयुष्यात अचानकपणे तात्या विंचूची एन्ट्री होते. त्यानंतर घडणारी धमाल या सिनेमात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सोनालीच्या लावणीचा ठसका...