(डावीकडून- मुग्धा गोडसे, सोनम कपूर, अमृता राव आणि दीपिका पदुकोण)
मुंबईः बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी रविवारी मुंबईत आयोजित स्टारडस्ट अवॉर्ड्स 2014च्या सोहळ्यात पोहोचले होते.
दीपिका पदुकोण, जॅकलिन फर्नांडिस, कृती सेनन, तापसी पन्नू, मुग्धा गोडसे, सोनम कपूर,
राखी सावंतसह अनेक सेलिब्रिटी ग्लॅमरस लूकमध्ये स्टारडस्ट अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अवतरले होते. तर नेहा धुपिया, ऋषिका लूल्ला, दिया मिर्झा, बिपाशा बसू, अमृता राव, दिव्या दत्ता, सोफी चौधरी,
अमिताभ बच्चन,
शाहरुख खान स्टायलिश लूकमध्ये यावेळी दिसले. अमृता राव ब-याच दिवसांनी मीडियासमोर आली होती.
या सोहळ्यात अभिनेता रणदीप हुड्डाला 'हायवे' सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर 'क्वीन' या सिनेमासाठी कंगना रनोट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. याशिवाय 'क्वीनला' सर्वोत्कृष्ट सिनेमा आणि इम्तियाज अलीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास झलक...