आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sonam Kapoor And Kalki Koechlin At Rahul Mishra Party

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX : पार्टीत कल्किसह पोहोचली सोनम, इतर सेलिब्रिटींनीही केले Outing

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनम कपूर
मुंबई - फॅशन डिझायनर राहुल मिश्राने गुरुवारी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी टाऊनमधील बरेच सेलेब्स सहभागी झाले होते. अभिनेत्री सोनम कपूर आणि कल्कि कोचलिन या पार्टीत पोहोचल्या होत्या.
सोनम कपूर - आपल्या ग्लॅमरस लूकने नेहमी चर्चा एकवटणारी सोनम या पार्टीत शेहला साडीत दिसली. तिने बॅकलेस ब्लाऊज परिधान केले होते. हातात फॅशनेबल गोल्डन कंगन आणि कानात गोल्डन इअरिंग तिने घातले होते. तिचा हा लूक खूप स्टायलिश दिसत होता.
कल्कि कोचलिन - राहुल मिश्राच्या पार्टीत अभिनेत्री कल्कि कोचलिनसुद्धा ग्लॅमरस रुपात अवतरली होती. ती यावेळी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. ग्रे ब्लॅक स्कर्ट आणि ब्लू शू तिने घातले होते. शिवाय तिच्या कानात लाँग गोल्डन इअररिंग दिसले.
अमिताभ बच्चन - शुक्रवारी उशीरा रात्री अमिताभ बच्चन एम्पायर स्टुडिओतून बाहेर पडताना दिसले. यावेळी त्यांनी व्हाइट ब्लू ट्रॅक सूट घातला होता. हातात मोबाईल घेऊन ते स्टुडिओच्या पाय-या उतरताना दिसले.
अर्जुन कपूर - गुरुवारी अभिनेता अर्जुन कपूरचा वाढदिवस होता. यावेळी तो आपल्या घरातून बाहेर पडताना दिसला. अर्जुन पाहुण्यांच्या स्वागतासाठी बाहेर उभा होता. तो फॉर्मल लूकमध्ये यावेळी दिसला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेलेब्सची छायाचित्रे...