आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sonam Kapoor, Fawad Khan Attend The Music Launch Of 'Khoobsurat'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pics : लाँचिंग इव्हेंटमध्ये सोनम बनली 'मसक्कली', इतर सेलेब्सही दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(खुबसूरतच्या म्युझिक लाँचवेळी सोनम कपूर)
मुंबई - सोनम कपूर सध्या आपल्या आगामी 'खुबसूरत' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा सिनेमा येत्या 19 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. शुक्रवारी या सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले. या सिनेमात सोनमसह पाकिस्तानी अभिनेता फवाद खान झळकणार आहे.
म्युझिक लाँच इव्हेंटमध्ये सोनम स्टायलिश लूकमध्ये दिसली. नेहमीप्रमाणे यावेळीही तिचा ड्रेस हटके होता. तिने ब्लॅक क्रॉप टॉपसह फ्लोरल प्रिंटेड स्कर्ट परिधान केला होता. यावेळी तिने सिनेमातील गाण्यावर तालसुद्धा धराल. डान्सवेळी तिने मसक्कली पोजसुद्धा दिले. या इव्हेंटमध्ये सोनमसह तिची बहीण रिया कपूर उपस्थित होती. रिया आणि त्यांचे वडील अनिल कपूर खुबसूरत या सिनेमाचे को-प्रोड्युसर आहेत.
शशांक घोष यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. यावर्षी रिलीज होणारा सोनमचा हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी तिचा 'बेवकुफियां' हा सिनेमा रिलीज झाला होता. मात्र तो फ्लॉप ठरला होता. त्यामुळे तिला या सिनेमाकडून जास्त आशा आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'खुबसूरत'च्या म्युझिक लाँच इव्हेंटमध्ये क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...