आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Watch: Sonam Kapoor Glamorous & Stylish Photos On Instagram

सोनमच्या ग्लॅमरस, स्टायलिश छायाचित्रांनी ओसंडून वाहतेय Instagram अकाउंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः मैत्रिणींसोबत सोनम कपूर)
मुंबईः सोनम कपूर स्टारर 'डॉली की डोली' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर संथ घौडदौड सुरु आहे. या सिनेमाचे एकुण बजेट 25 कोटी असून सिनेमाने आत्तापर्यंत 16.81 कोटींची कमाई केली आहे. सध्या सोनम फ्रान्समध्ये असून पेरिस हट कूटुर पॅशन वीकमध्ये आपला जलवा दाखवत आहे.
या फॅशन वीकमधील काही छायाचित्रे सोनमने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. या इव्हेंटमध्ये सोनमला डिझायनर जियोर्जियो अरमान यांनी आमंत्रित केले. या इव्हेंटमध्ये सोनम अरमानी स्प्रिंग 2015च्या कूटुर कलेक्शनच्या प्लगिंग नेकलाइन ड्रेसमध्ये दिसली. तिने मॅचिंग इअररिंग्स आणि टीबार सँडल घातली होती. या लूकमध्ये सोनमचा ग्लॅमरस अंदाज बघायला मिळाला. चार दिवस सोनम येथे राहणार आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केली छायाचित्रे...
सोनम नेहमीच स्टायलिश लूकमध्ये दिसते. इव्हेंट छोटा असो किंवा मोठा, सोनम आपली छायाचित्रे नक्की क्लिक करते. त्यानंतर आपल्या चाहत्यांसाठी ती ही छायाचित्रे इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करते. काही छायाचित्रांमध्ये तिचा ग्लॅमरस लूक दिसतोय, तर काहींमध्ये ती मित्रांसोबत धमाल करताना दिसतेय. याशिवाय वडिल अनिल कपूरसोबतची, फिल्म प्रमोशनमध्ये सहभागी होतानाची सोनमची छायाचित्रे इंस्टाग्रामवर पाहायला मिळतात.
सोनमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर उपलब्ध छायाचित्रांमधून आम्ही निवडक 15 फोटो तुम्हाला दाखवत आहोत. पुढे पाहा, सोनमचा दिलखेचक अंदाज...