आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam Kapoor Gorgeous Look At Namrata Soni's Sangeet

मैत्रिणीच्या लग्नात सोनम कपूरचा दिसला ग्लॅमरस लूक, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नम्रता सोनीच्या संगीत सेरेमनीत सोनम कपूर)
मुंबई - बॉलिवूडची स्टायलिश अभिनेत्री सोनम कपूर नेहमी आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असते. अलीकडेच ती तिची बेस्ट फ्रेंड आणि मेकअप आर्टिस्ट नम्रता सोनीच्या संगीत सेरेमनीत पोहोचली होती. यावेळी सोनमचा देसी लूक पाहायला मिळाला.
सिल्व्हर ब्लू साडीत सोनम खूपच आकर्षक दिसली. या संगीत सेरेमनीत सोनमने तिच्या आगामी 'खुबसूरत' या सिनेमातील गाण्यांवर ताल धरला होता. तिचा हा सिनेमा येत्या 19 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.
सोनमची मैत्रीण नम्रता बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. 'ओम शांति ओम' या सिनेमासाठी तिला प्रतिष्ठेचा आयफा अवॉर्ड मिळाला आहे. सोनमशिवाय नम्रता शाहरुख खान, मलायका अरोरा खान, प्रिती झिंटा, दीपिका पदुकोण या स्टार्सची चांगली मैत्रीण आहे.
लंडनमध्ये शिकलेल्या नम्रताने आत्तापर्यंत अनेक मॅगझिन्सच्या फोटोशूटसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा नम्रता सोनी आणि इतर मैत्रिणींसोबतची सोनमची खास छायाचित्रे...