आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'डॉली कि डोली'च्या शुटिंगसाठी सोनम दहा दिवस नाशकात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रांझणा' आणि 'भाग मिल्खा भाग'सारखे हिट सिनेमे देणारी अभिनेत्री सोनम कपूरने अलीकडेच रिलीज झालेल्या 'बेवकूफिया' सिनेमात काम केले. या सिनेमात तिचा को-स्टार आयुष्यमान खुराणा होता. सिनेमात सोनमने बिकिनी परिधान केली होती. त्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसली होती. तरीदेखील तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
आता सोनम पुन्हा एकदा महिला केंद्रीत सिनेमात नशीब चमकवण्याचा प्रयत्न करत आहे. तिचा होम प्रॉडक्शन 'खुबसूरत' हा सिनेमाची शुटिंग पूर्ण झाली असून त्याचे पोस्ट प्रॉडक्शन काम चालू आहे.
पुढील आठवड्यात सोनम आपल्या आणखी एका 'डॉली की डोली' सिनेमाची शुटिंग नाशिक येथे सुरू करणार आहे. इथे सिनेमाच्या शुटिंगचे दहा दिवसांचे वेळापत्रक आहे.
'डॉली डि डोली' स्त्री प्रधान सिनेमा असून त्याचे दिग्दर्शक अभिषेक डोगरा आहेत. सिनेमाचा निर्माता अरबाज खान आहे. सिनेमात सोनम कपूरसोबत राजकुमार राव आणि पुलकित सम्राटसुध्दा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमा हे तिन्ही स्टार्स पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. सोनम कपूर अभिनीत हा सिनेमा 2014च्या शेवटी रिलीज होण्याची अपेक्षा आहे.