आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खूबसूरत’च्या रिमेकसाठी रेखाचा सल्ला नाही- सोनम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल कपूर आणि त्याची मुलगी रिया 1980 मध्ये हृषीकेश मुखर्जीद्वारा प्रदर्शित झालेल्या ‘खूबसूरत’ चित्रपटाचा रिमेक तयार करत आहेत. यामध्ये सोनम कपूर मूळ चित्रपटात रेखाने साकारलेली भूमिका करत आहे. नुकतेच सोनमने याबाबत रेखाकडून कोणताही सल्ला घेतला नसल्याचा खुलासा केला आहे. तिने आजच्या काळातील बदल लक्षात घेऊन तयार झालेल्या या कथेमध्ये आपल्याच शैलीत काम केले आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून सध्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. सोनम आणि रेखा एकमेकांना जरूर भेटतात. मात्र, या विषयावर त्यांची चर्चा होत नाही ही आश्चर्यकारक गोष्ट वाटते.