आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय डिझायनर्सना प्रमोट करतेय सोनम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
67 वा 'कान्स चित्रपट महोत्सव' 16 ते 19 मे दरम्यान होत आहे. सोनम कपूर या महोत्सवात सलग चौथ्यांदा सहभागी होत आहे. या वेळीही सोनमच्या लूकमध्ये भारतीयत्वाची झलक पाहायला मिळणार आहे. सोनमने याबाबत सांगितले की, 'मी परदेशात होणार्‍या सर्व कार्यक्रमात नेहमीच भारतीय डिझायनर्सना प्रमोट करण्याचा प्रयत्न केला आहे.'
सोनमने मागील महोत्सवात डॉल्स आणि गब्बानाचा फ्लोरल ड्रेस घातला होता. परदेशी चित्रपट महोत्सव असो अथवा फॅशन शो, सोनम जिथे जाते तिथे ती भारतीय डिझायनर्सना प्रमोट करत असते. या प्रतिष्ठित महोत्सवात सहभागी होणार्‍या भारतीय सिनेतार्‍यांमध्ये सोनमवरच परदेशी माध्यमांची अधिक नजर असते. कपड्यांची चांगली जाण असल्याने परदेशात सोनमच्या प्रशंसेत बरीच भर पडली आहे. याबाबत सोनम म्हणते की, माझ्या शरीराच्या रचनेनुसार मी कपडे घालते. त्यामुळे मला ते अगदी सुंदर दिसतात.