आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सावित्रीबाई फुले\' मालिकेचा प्रोमो भोपाळमध्ये लाँच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनयासाठी कोणतेच शॉर्टकट नाहीये. यंगस्टर्स थिएटर आणि अभिनय अ‍ॅकॅडमीमधून व्यक्तीमत्व बनवून इंडस्ट्रीमध्ये यावे. चांगल्या कलाकारांची इंडस्ट्रीला प्रतिक्षा आहे, असे वक्तव्य, 'राखी का स्वयंवर', 'प्रतिज्ञा', 'जमुनिया' आणि 'सावधान इंडिया' फेम अभिनेता मनमोहन तिवारीने रविवारी (4 मे) रवींद्र भवनमध्ये केले.
आरजीडी प्रॉडक्शनच्या 'क्रांतीवीर ज्योत सावित्रीबाई फुले' या मालिकेचा प्रोमो लाँच करण्याच्या निमित्ताने भोपाळला पोहोचलेल्या मनमोहनसह अनेक स्टार्स इथे पोहोचले होते. कार्यक्रमामध्ये आर डीजी प्रॉडक्शनचे प्रमुख रुपेश डी गोहिल, निर्माता राजाराम पाटीदार, सिनेमा अभिनेत्री मेघा दानी, कास्टिंग दिग्दर्शक साबिर मुस्तफा आणि आर डीजी प्रॉडक्शनचे प्रमुख युसूफ सुरतीसुध्दा उपस्थित होते.
'सावित्रीबाई फुले'मध्ये सर्व कलाकार भोपाळचे आहेत. यावेळी या सर्व कलाकांचा सन्मान करण्यात आला. सोबतच, 'लागा चुनरी मे दाग' मालिकेची भोपालमध्ये शुटिंग आणि भोपालवरून कास्टिंग करण्याची घोषणा निर्माता रुपेश गोहिलने केली आहे. यावेळी डीजी नॅशनलवरील 'ये शादी है या सौदा' या मालिकेची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या खरेला सन्मानित करण्यात आले.