आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमला बसला लाखोंचा फटका, घरातून चोरी गेला हि-यांचा हार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सोनम कपूर)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी चोरी झाली आहे. यामध्ये तिचा हि-यांचा हार चोरी गेला आहे. या हाराची किंमत 5 लाख असल्याचे सांगितले जात आहे. सोनमने जुहू पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली आहे आणि पोलिसांनी याची चौकशी सुरु केली आहे.
सोनम सध्या 'प्रेम रतन धन पायो' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये सलमान खानने मुख्य भूमिका साकारली आहे. शिवाय मागील महिन्यात रिलीज झालेल्या 'डॉली की डोली' सिनेमासाठी तिची समीक्षकांकडून प्रशंसा झाली होती. हा सिनेमा अरबाज खानने दिग्दर्शित केला होता.