आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हटके ड्रेसेस आणि फॅशनची दीवानी आहे सोनम, पाहा तिच्या वेगवेगळ्या Looks चे 25 Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वेगवेगळ्या लूक्समध्ये सोनम कपूर)
मुंबईः बॉक्स ऑफिसवर आज सोनम कपूर स्टारर 'खुबसूरत' हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात तिच्यासह पाकिस्तानी अभिनेता फवाद अफजल खान रोमान्स करताना दिसणार आहे. दोघांनाही सिनेमाच्या प्रमोशनसाठी बरीच मेहनत घेतली. टीव्ही रिअॅलिटी शोजपासून ते अनेक इव्हेंटमध्ये सोनम-फवादची जोडी दिसली.
प्रमोशनदरम्यान सोनम वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसली. तसे पाहता, सोनम बॉलिवूडमध्ये आपल्या उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. फॅशन आणि ड्रेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. पार्टी, लाँचिंग इव्हेंट, फिल्म स्क्रिनिंग, जिथेही ती पोहोचले तेथे तिचा लूक इतर अभिनेत्रींच्या तुलनेत नेहमीच वेगळा असतो. रॅम्पवरसुद्ध सोनम स्टायलिश लूकमध्ये दिसते. सलवार सूट असो, साडी असो, किंवा शॉर्ट ड्रेस, प्रत्येक प्रकारचा ड्रेस तिच्यावर शोभून दिसत असतो. अशाच वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये सोनम 'खुबसूरत'मध्येसुद्धा दिसणार आहे.
'खुबसूरत' हा सिनेमा शशांक घोष यांनी दिग्दर्शित केला आहे, तर सोनमची बहीण रिया आणि वडील अनिल कपूर याचे निर्माते आहेत. सोनमचा यावर्षी रिलीज होणारा 'खुबसूरत' हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी रिलीज झालेला 'बेवकूफियां' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता, त्यामुळे तिला या सिनेमाकडून ब-याच आशा आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये आम्ही तुम्हाला सोनमची वेगवेगळ्या लूक्सची निवडक छायाचित्रे दाखवत आहोत...