आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनम म्हणते कॅटरिना निर्लज्ज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सांवरियासारख्या सुपरफ्लॉप चित्रपटाने करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री सोनम कपूर आपल्या वाचाळपणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रसिद्ध लेखिका शोभा डे आणि एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरवर तोंडसुख घेणाºया सोनमने कॅटरिनावर तिखट शब्दात टीका केली आहे.
कॅटरिनासारखे रोल स्वीकारायला मी निर्लज्ज नाही, असे सोनम कपूरने नुकतेच बोलताना सांगितले आहे. प्लेअर्स आणि मौसमसारखे फ्लॉप चित्रपट साइन करण्यामागचा उद्देश काय, या प्रश्नावर सोनमने स्वत:ची बाजू मांडण्याऐवजी कॅटरिनाच्या फोटोशूटवर प्रतिक्रिया देत तिला निर्लज्ज ठरविले.
सोनम म्हणाली, कॅटरिनाला संपूर्ण आदराने मी पुष्पगुच्छ देऊ इच्छिते. यामागचे कारण विचारल्यावर सोनमने सांगितले की, असे फोटोशूट ती कशी देऊ शकते याची मला कल्पना नाही. मात्र,त्यासाठी कामाप्रती बांधिलकी आणि निर्लज्जपणा लागतो. असे चित्रपट करण्यासाठी मला अशा गोष्टी शिकाव्या लागतील असेही तिने यावेळी बोलताना सांगितले.