अर्जुन कपूर, करिश्मा कपूर आणि सोनम कपूर
मुंबई - यावर्षी 'गुंडे' आणि '2 स्टेट्स' हे दोन हिट सिनेमे देणारा अभिनेता अर्जुन कपूर आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अर्जुनने आपल्या चुलत बहिणभावंडांसोबत जुहूमध्ये लेट नाइट पार्टी साजरी केली. या पार्टीत बी टाऊनमधील ग्लॅमरस गर्ल्ससुद्धा सहभागी झाल्या होत्या.
अर्जुनची चुलत बहीण सोनम कपूर आणि भाऊ मोहित मोरवाह या पार्टीत पोहोचले होते. सोनम मोहितसोबत पार्टीत सहभागी झाली होती. नेहमी आकर्षक लूकमध्ये दिसणारी सोनम यावेळी कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिने ब्लू जीन्स आणि ब्लॅक ब्लेजर घातले होते. तिच्या लूकविषयी अर्जुनने ट्विट केले, "Sonam Kapoor I have the pleasure of thee company & she's dressed the way I like."
या पार्टीत करिश्मा कपूरसुद्धा सहभागी झाली होती. ब्लॅक जीन्स आणि ब्लॅक टॉपमध्ये ती दिसली. याशिवाय मलायका अरोरा, अमृता अरोरासुद्धा अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पोहोचल्या होत्या. अर्जुनने आपल्या वाढदिवसाची छायाचित्रे
ट्विटरवर पोस्ट केली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अर्जुनच्या बर्थडे सहभागी झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...