आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गाईड'मधील 'रोजी'ची भूमिका करण्‍याची सोनमची इच्‍छा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गाईड' या चित्रपटातील वहिदा रहेमान यांची गाजलेली भूमिका साकारण्‍याची इच्‍छा सोनम कपूरने व्‍यक्‍त केली आहे. 1995मध्‍ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट देव आनंद आणि वहिदा रहेमान यांच्‍या जोडीमुळे सुपरहिट झाला होता.
हा चित्रपट आर.के.नारायण यांच्‍या 'द गाईड' या कादंबरीवर आधारित होता. 'गाईड'मधील वहिदाच्‍या रोजी मारकोला प्रेक्ष्‍ाकांनी डोक्‍यावर घेतले होते. सोनम याबाबत म्‍हणाली की, 'मी वहिदाजींसोबत 'दिल्‍ली-6'मध्‍ये काम केले होते. त्‍या खूपच चांगल्‍या अभिनेत्री आहेत. मी त्‍यांना माझी आदर्श मानते. जर मला जुन्‍या काळातील एखादी भूमिका करण्‍याचा प्रस्‍ताव आल्‍यास मला वहिदाजींची 'रोजी' साकारायला आवडेल. कारण, रोजीच्‍या भूमिकेला विविध कंगोरे होते. सकारात्‍मक, नकारात्‍मक असे दोन्‍ही पैलू दिसले.'