(सोनू निगमचा मुलगा निवानसह दोन विविध छायाचित्रात)
मुंबई: बॉलिवूडचा पार्श्वगायक आणि म्यूझिक कम्पोजर सोनू निगम शुक्रवारी एका इव्हेंटमध्ये सामील झाला होता. या इव्हेंटमध्ये 'थ्री वुमेन' या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात सोनूची पत्नी मधुरिमानेसुध्दा अभिनय केला. इव्हेंटदरम्यान सोनू त्याचा मुलगा निवानसह दिसली.
निवान दिर्घकाळानंतर मीडियासमोर दिसला आहे. तो आता 7 वर्षांचा झाला आहे. इव्हेंटमध्ये निवान चेक ब्लू शर्ट, ब्लू जीन्स गेटअपमध्ये दिसला. त्याने स्पोर्ट्स शूज घातलेले होते. निवानचे एक व्हिडिओ सोनू निगमने यू-ट्यूबवर अपलोड केला होता तेव्हा तो चर्चेत आला होता. या व्हिडिओमध्ये निवानने 'कोलावरी डी' गाणे गायले होते. या गाण्यात त्याच्या अंदाज इतका छान होता, की व्हिडिओ केवळ 22 तासांत 52 हजार लोकांपेक्षा जास्त जणांनी पाहिला होता.
निवानचा लूक पहिल्यापेक्षा खूप बदलला आहे. तो आता खूपच स्टाइलिश दिसत आहे. सोनू आणि निवानची हेअरस्टाइल थोडीशी सारखीच दिसून येत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निवानची मम्मी-पापासोबतची छायाचित्रे...