आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sophie Choudry Birthday: Foreign Actress In Bollywood

सोफी, सनीसह बॉलिवूडमध्ये या परदेशी अभिनेत्रींची चालली जादू, जाणून घ्या त्यांच्याविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूळची ब्रिटीश असलेली सोफी चौधरी प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री आहे. लंडनमध्ये जन्मलेल्या सोफी अनेक बॉलिवूड सिनेमांत दिसलेली आहे. शिवाय एक गायिका आणि होस्टसुध्दा आहे. सोफी आज आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे.
हॉलिवूड अभिनेत्रीकडून घेतले नाव-
सोफीचा जन्म लंडनमध्ये झाला. तिचे वडील इटालिअन-फ्रेंच अभिनेत्री सोफिया लॉरेनचे मोठे चाहते होते. म्हणून त्यांनी आपल्या मुलीचे नाव सोफिया ठेवले. नंतर तिने आपले नाव बदलून सोफी केले. सोफीला एक थोरला भाऊदेखील आहे. सध्या ती आपली आई आणि आजीसोबत राहते.
म्यूजिकमध्ये पटकावले सुवर्णपदक-
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी शिक्षण घेतलेली सोफी संगीत आणि ड्रामेटिक आर्ट्समध्ये गोल्ड मेडॅलिस्ट आहे. अभिनयाशिवाय गायन आणि डान्स करणेसुध्दा तिला आवडते. तिने जवळपास एक वर्षे भारतनाट्यम आणि कथकचे प्रशिक्षण घेतले. काही दिवसांपूर्वी सोफी डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा'मध्येसुध्दा दिसली होती.
बॉलिवूडमध्ये केले काम-
प्रमुख सिनेमे-
शादी नंबर वन, प्यार के साईड इफेक्ट्स (2005), हे बेबी, अगर, स्पीड (2007), मनी है तो हनी है, किडनॅप (2008), आ देखे जरा, डॅडी कूल, चिंटूजी (2009), शूट आऊट अॅट वडाला, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा (2013) या सिनेमात सोफी महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.
सोफी एक ब्रिटीश अभिनेत्री असून ती बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. केवळ सोफीच नव्हे, कतरिना कैफ, सनी लिओनी, जॅकलीन फर्नांडिससारख्या अनेक अभिनेत्री आहेत ज्या आज बॉलिवूडमध्ये
प्रसिध्द अभिनेत्री झाल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या परदेशी तरुणींनी बॉलिवूडमध्ये कमावले नाव...