आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Actress Rima Kallingal Protest Against Dowry System

B\'day: हुंडा प्रथेचा केला होता अनोख्या पध्दतीने विरोध, पाहा या अभिनेत्रीचे खास PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय अभिनेत्री रीमा कलिंगल 31 वर्षांची झाली आहे. 19 जानेवारी 1984 रोजी केरळमधील थ्रिस्सुरला जन्मलेली रीमा 2009मध्ये सिनेसृष्टीत आली. यापूर्वी ती 2008मध्ये मिस केरळ स्पर्धेत रीमा फर्स्ट रनर-अप ठरली होती. रीमा मल्याळम सिनेमांसाठी ओळखली जाते. ती सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक आहे.
रीमा कलिंगलचे फिल्मी करिअर-
आतापर्यंत 26 सिनेमांमध्ये काम केलेल्या रीमा 13 विविध पुरस्कारांसाठी नॉमिनेट झाली आहे. त्यापैकी सात पुरस्कार तिने आपल्या नावी केले आहेत. यामध्ये फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट अभिनेत्री, केरळ फिल्मी अवॉर्ड फॉर बेस्ट अभिनेत्री, फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट अभिनेत्री (मल्याळम) आणि सेकंड साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड फॉर बेस्ट अभिनेत्री हे पुरस्कार सामील आहेत. मल्याळम सिनेमांसोबतच, तिने एक-दोन तमिळ सिनेमेदेखील केले आहेत. परंतु बॉलिवूडविषयी सांगायचे झाले तर ती अद्याप यापासून दूर आहे.
हुंडा प्रथेच्या विरोधात उचलला आवाज-
रीमा कलिंगनने हुंड्याच्या प्रथे विरोधात एक अनोखे पाऊल उचलले होते. तिने 1 नोव्हेंबर 2013मध्ये दाक्षिणात्य दिग्दर्शक आशिक अबूसोबत लग्न केले. यावेळी रीमाने एकसुध्दा सोन्याची वस्ती अंगावर घातली नाही. दाक्षिणच्या परंपरेनुसार, वधू डोक्यापासून पायापर्यंत सोन्याच्या दागिन्यांनी नटलेली असते. परंतु रीमा अंगावर एकही दागिना न घातला लग्न केले. हुड्यांच्या प्रथे विरोधात तिने हे पाऊल उचलले होते. तिने खूपच साध्या पध्दतीने रजिस्टर्ड मॅरेज केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रीमा कलिंगनच्या लग्नाची आणि खासगी आयुष्यातील काही छायाचित्रे...